निफाणवाडीमध्ये २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी; निफाणवाडीतील रहिवाशांना मिळणार लाभ

निफाणवाडीमध्ये २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी; निफाणवाडीतील रहिवाशांना मिळणार लाभ 

 


पनवेल(प्रतिनिधी) निफाणवाडी येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने टाटा स्टील फाऊंडेशन या टाटा स्टीलच्या सीएसआर संस्थेने खालापूर तालुक्यातील निफाणवाडीमध्ये २० हजार लिटर क्षमतेची पाणी साठवण्याची टाकी बसवली आहे.या टाकीमुळे  निफाणवाडीतील ६२ रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

       ग्रामीण जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना पिण्याचे सुरक्षित पाणी पुरवण्यासाठी टाटा स्टील वचनबद्ध आहे. त्या अनुषंगाने या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच प्राची लाडउपसरपंच नागेश मेहतर,  ग्रामपंचायत सदस्य संतोष बैलमारेस्वाती किलांजेरुबिना पवारनम्रता तटकरेग्रामसेवक योगेश पाटील आणि टाटा स्टील एज्युकेशनच्या प्रमुख स्मिता अग्रवाल उपस्थित होते.

 टाटा स्टील प्लांटच्या आजूबाजूच्या भागातील स्थानिक जनतेला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) आणि सावरोली ग्राम पंचायत यांनी पाण्याची टाकी बसवण्यासाठी सहयोग दिला. गावात पाण्याची टाकी बसवली जावी ही स्थानिक ग्रामस्थांची बऱ्याच काळापासूनची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे. याआधी देखील टाटा स्टीलने निफाणवाडीतील २२ घरांच्या नुतनीकरणात मदतीचा हात दिला होता. पर्यावरणपूरक रोजगारपायाभूत सोयीसुविधांचा विकास आणि आरोग्य सेवा पुरवून टाटा स्टील स्थानिक समुदायांना मदत करत आहे.  आता निफाणवाडीमध्ये पुरवण्यात आलेल्या या नव्या सुविधेमुळे कंपनी स्थानिकांना पाणी पुरवू शकते. पाण्याच्या तुटवड्याची समस्या सोडवल्याबद्दल स्थानिकांनी टाटा स्टील फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.   

Attachments area