चालक दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन शाखा पनवेल व जाणीव एक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिन संपन्न

चालक दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन शाखा पनवेल व जाणीव एक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिन संपन्न 


पनवेल दि . १८ ( वार्ताहर ) : चालक दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन शाखा पनवेल व जाणीव एक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिना निमित्त एस टी डेपो पनवेल,रिक्षा नाका एस टी स्टँड,अग्निशमन दल पनवेल व जिल्हा रुग्णालय येथील अँबुलन्स चालक यांचा सत्कार करण्यात आला.                                          याप्रसंगी पनवेल शाखेचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरें व दिनेश बागुल , अशोक वारे तसेच राज्य परिवहन मंडळ पनवेल डेपो ऑफिसर ज्ञानेश्वर म्हात्रे  व जाणिव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जयराम पाटील,उपाध्यक्ष उमेश इनामदार, सचिव महेश सरदेसाई, प्रसाद हनुमंते राजा चव्हाण, शैलेश कदम, विजय डिसोझा, राजू सावंत, परेश बोरकर, प्रितम म्हात्रे, मंगेश चंदने, केतन खुंटले, नरेन्द्र सोनवणे आदि उपस्थित होते.