बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई

बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई


पनवेल दि.7 (वार्ताहर) : बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पनवेल परिसरात बेकायदेशीररित्या पैसे लावून ५२ पत्त्यांचा जुगार खेळ जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शकाखाली विशेष पथकाने धाड टाकून ६ हजार रुपये रोख रक्कम व पत्त्यांचा जोड हस्तगत करून ५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.