सुमेधला आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून परदेशातील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा

 सुमेधला आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून परदेशातील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा


पनवेलमधील सुमेध संजय कदम हा तरुण लंडनमधील ऑक्सफोर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटी हेडिंगंटन येथे एमएससी, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग विथ इलेक्ट्रिक वेहिकल्स या कोर्सचे उच्च शिक्षण घेणार आहे.  त्या अनुषंगाने आज (दि. १६)पुढील यशस्वी वाटचालीकरिता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुमेधला शुभेच्छा दिल्या.  यावेळी भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुमेधचे वडील संजय कदम उपस्थित होते.