अगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मिडलक्लास हौैंसिंग सोसायटीच्या मैदानाची बुधवारी नागरीकांसह पाहणी केली
पनवेल (प्रतिनिधी)- अगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मिडलक्लास हौैंसिंग सोसायटीच्या मैदानाची बुधवारी नागरीकांसह पाहणी केली. गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहे. त्यानुसार मिडलक्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानात नवरात्र उत्सवाची तयारी सुरु आहे. मात्र अनेक दिवसांपासून पनवेल महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मिडलक्लास हौंसिंग सोसायटीच्या मैदानाची पाहणी करुन या उत्सवाच्या आयोजना संदर्भात चर्चा केली. या पाहणी वेळी सुमीत झुंझारराव, दर्शन ठाकूर, जितेंद्र झुंझारराव, रोशन ठाकूर, प्रविण मोरबले उपस्थित होते.