रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे मुफ्त डोळे तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

 

रोटरी खारघर मिड टाऊन तर्फे मुफ्त डोळे तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न


खारघर (प्रतिनिधी)- रोटरी खारघर मिड टाऊन व आर जे शंकरा हॉस्पिटल तर्फे पेन चां वरवणे गावात मुफ्त डोळे तपासणी शिबिरच आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११३ लोकानी आपले डोळे तपासून घेतले. यात २२ लोकांना मोतीबिंद च आजार सापडले. या २२ लोकांना लगेच मोतीबिंद च मुफ्त ऑपरेशन साती शंकरा हॉस्पिटल ला नेण्यात आले. २८ लोकांना मुफ्त चास्मा च वाटप करण्यात आले.

तसाच १७ तारखेला I T M कॉलेज , खारघर सोबत खारघर ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला. ११७ बॉटल जमा करण्यात आला. लोकांनी खूप उत्सहिने भाग घेतला.

रोटरी खारघर मिड टाऊन असा उपक्रम गेल्या १६ वर्षापासून  सतत करत असते असे रोटरी अध्यक्ष श्री प्रशांत कालन व प्रोजेक्ट डायरेक्टर श्री अनुप गुप्ता यांनी सांगितले