उद्योग मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
रत्नागिरी दि. 18 :- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई आयोजित राज्यस्तरीय दिपस्तंभ पतसंस्था पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: ग्रीनलिफ रिसॉर्ट, निवळी रोड, गणपतीपुळे, रत्नागिरी).
दुपारी 2 वाजता मिऱ्या-नागपूर महामार्ग संदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी ३.०० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस सेवा वाहतूक व्यवस्थेबाबत बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी 3.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल व बॅडमिंटन कोर्ट संदर्भात बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय विभाग प्रमुखाची आढावा बैठक. (स्थळ : जिल्हा परिषद, रत्नागिरी).
सायंकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी कडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्रैा 10.10 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.