सामाजिक न्याय विभागाचा 90 वा स्थापना दिन
विविध कार्यक्रमांनी साजरा होणार
नवी मुंबई,दि.14- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाला दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण होत आहेत त्याअनुषंगाने विभागाच्या स्थापना दिनानिमित्त समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुंबई विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या स्थापनेच्या दिवसाची आठवण म्हणून 15 ऑक्टोबर हा दिवस 90 वा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी मुंबई विभागात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्हयांमध्ये तसेच ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी असणाऱ्या शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कला गुणदर्शन, मान्यवरांची व्याख्याने, वक्तृत्व/निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.
उपसंचालक (माहिती)
कोकण विभाग, नवी मुंबई