झंकार नवरात्र उत्सव

 झंकार नवरात्र उत्सव

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्यावतीने 'झंकार नवरात्र उत्सव २०२२' चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे उत्सवाचे १६ वे वर्ष आहे. मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सुरु आसलेल्या या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि ज्येष्ठनेते वाय.टी.देशमुख यांनी शुक्रवारी भेट दिली. तसेच भाजपच्या पनवेल तालुका महिलामोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्याहस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, सुलोचना कल्याणकर, रुचीता लोंढे, सुमित झुंजारराव, हर्ष गुप्ते, रिहा गुप्ते यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.