पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाचे सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल टाइम्सच्या दिवाळी अंकाचे सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल टाइम्सच्या दिवाळी विशेषांकात साहित्याची मंदियाळी - लोकनेते रामशेठ ठाकूर 
पनवेल टाइम्स या अंकाचे साहित्य दर्जेदार आणि वाचनिय- सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके सुरेल कंठातून गणेश कोळी यांचे कौतुक





पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक आरोग्य, सण- उत्सवाबरोबरच महिला सक्षमीकरण संदर्भात साहित्याची मंदियाळी पनवेल टाइम्सच्या दिवाळी विशेषांकात प्रकर्षाने अधोरेखित होत असून हा दिवाळी अंक वाचनीय आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्स या वृत्तपत्राच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते झाले. या अंकांची प्रत लोकनेते रामशेठ ठाकूर यांना संपादक गणेश कोळी यांनी सप्रेम भेट दिली. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गणेश कोळी यांचे कौतुक केले. 
      यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक संजय पोतदार, माजी उपमहापौर चारुशीला घरत, ज्योती कलामंचच्या अध्यक्षा ज्योती देशमाने, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, पत्रकार सुमंत नलावडे आदी उपस्थित होते. 
           गणेश कोळी गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रियतेने कार्यरत आहेत. आपल्या वृत्तपत्रातून सामाजिक प्रश्न मांडताना त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्राने मोठी उंची गाठली आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद करून गणेश कोळी यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
        दिवाळी अंकाचे साहित्य वाचनीय असावे असे प्रत्येक वाचकाला वाटते, त्याचप्रमाणे पनवेल टाइम्स या अंकाचे साहित्य दर्जेदार आणि वाचनिय आहे, अशी पोचपावती सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी गणेश कोळी यांना दिली. वाचनीय अशा या अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, याचा मला अत्यानंद आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या सुरेल कंठातून गणेश कोळी यांचे कौतुक केले.