जि. प. सदस्य रविंद्र वि. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद – महेंद्रशेठ घरत

 

जि. प. सदस्य रविंद्र वि. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद – महेंद्रशेठ घरत


प्रतिनिधी- गव्हाण जिल्हा परिषद सदस्य श्री. रविंद्र विश्वनाथ पाटील हे एक कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष सदस्य असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागाचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे असे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाण, कोपर, शेलघर स्मशानभूमी वॉलकंपाउंड सुशोभनीकरणाचा शुभारंभ करताना काढले.

              गव्हाण जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा परिषद व सिडकोच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून पूर्ण मतदार संघात न्हावे, गव्हाण, वहाळ, ओवळे ग्रामपंचायत हद्दीतील कामे मार्गी लावण्यात ते यशस्वी झालेले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या, ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात असे गौरवोद्गार महेंद्र घरत यांनी काढले.

                यावेळी माजी सरपंच जेष्ठ नेते श्री. वसंत म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य श्री.रविंद्र विश्वनाथ पाटील, माजी सरपंच सौ. जिज्ञासा कोळी, उपसरपंच श्री. विजय घरत, श्री. अरुण कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत श्री. काशिनाथ कोळी, श्री. किरण घरत, श्री. विशाल कोळी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.