नवी मुंबईमध्ये बौद्धिक दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी क्षेत्रीय पालक संमेलनाचे आयोजन
नवी मुंबई (प्रतिनिधी)- क्षेत्रीय पालक संमेलन (रिजिनल पेरेंट्स मीट RPM) ही नवी मुंबई महानगर पालिका इ.टी.सी. केंद्र वाशी येथे दिनांक 15 व 16 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित केली होती. या संमलेनाचे आयोजन परिवार एन सी पी ओ, तर संमलेनाचे प्रायोजक राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई संस्था, भारत सरकार आणि संमलेनासाठी सहयोग नवी मुंबई महानगर पालिका इ.टी.सी. केंद्र वाशी यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित केली होती.. या संमलेनामध्ये 290 हुन अधिक पालक सहभागी झाले होत. या पालक संमलेनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या विविध राज्यातून पालक आले होते. या प्रादेशिक पालक संमलेनाची थीम होती . "समान उपजीविकेच्या संधी आणि सन्मानाने जगणे".
या संमेलनाच्या उद्धघाटनच्या वेळी डॉ वर्षा भगत संचालिका नवी मुंबई महानगर पालिका इ. टी. सी. केंद्र वाशी ह्या उपस्थित होत्या.
थीमशी संबंधित पहिल्या दिवशी शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 विविध विषय तज्ज्ञांनी आपआपले मत मांडले. यामध्ये 1.Cdr. श्रीरंग बिजूर, अध्यक्ष, परिवार एन सी पी ओ यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी शाश्वत रोजगार/आजीविका या विषयावर मार्गदर्शन केले.2. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी दिव्यांगता जागरूकता आधारित ऍनिमेटेड फिल्म्स चे अनावरण केले. 3. सुश्री क्लेलिया पावलॉस व्याख्याता मनोविज्ञान रा. बौ. दि. स. सं, क्षे . कें. न मुं यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी त्यांच्या पालकांचे आणि कुटुंबांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण, 4. श्री. पी. एस. बुरडे, अध्यक्ष, परिवार एन सी पो ओ सह्याद्री यांनी उपजीविकेसाठी स्व वकालात आणि प्रासंगिकता 5. श्री. सुरेश पाटील, सचिव संवेदना लातूर यांनी RPwD कायदा 2016 6. श्री व्यंकट लामजणे, राज्य समन्वयक, SNAC, यांनी महाराष्ट्र व भारत सरकारच्या योजना 7. श्री विश्वास गोरे व्यवस्थापक आधार निवासी शाळा या विविध विषयावर सर्व पालक व व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी दिनांक रविवार 16 ऑक्टोबर 2022 रोजी 1. डॉ शीतल समन्वयक AWMH यांनी शीघ्र हस्तक्षेपाचे महत्व, 2. सुश्री अनुषा संपत व्याख्याता भौतिकोपचार, रा. बौ. दि. स. सं, क्षे . कें. न मुं यांनी बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी घरगुती उपचारात्मक व्यवस्थापन, 3. श्री नितीन शहा, श्री अशोक चव्हाण व श्री राजेंद्र जोशी SVRR यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य यावर चर्चा केली. 4. Cdr. श्रीरंग बिजूर, अध्यक्ष, परिवार एन सी पी ओ यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीला सक्षम करण्यात पालकांची भूमिका 5. डॉ. रवी प्रकाश सिंह प्रभारी अधिकारी रा. बौ. दि. स. सं, क्षे . कें. न मुं यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बौद्धिक दिव्यांग मुलांचे शिक्षण, डॉ रमेश बावसकर, प्रभारी अधिकारी, क्षेत्रीय संशोधन संस्था होमिओपॅथी नवी मुंबई यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तीसाठी होमिओपॅथी उपचार, सुश्री अदिती वर्मा आणि श्री प्रणय बुरडे यांनी माझी निवड या विविध विषयावर पालकाना मार्गदर्शन केले.
संमेलनामध्ये एका समस्येवर पालक संघटना आणि एनजीओची नोंदणी होण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल काही पालकांनी अपंगत्वासाठी आयुक्तांच्या अधिकाऱ्याविरोधात संताप व्यक्त केला. काही पालकांनी असेही सांगितले की पालक संघटना आणि एनजीओच्या नोंदणीसाठी पोर्टल सदोष आहे आणि त्यात सुधारणा आवश्यक आहेत.
सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉ. रविप्रकाश सिंग प्रभारी अधिकारी, रा. बौ. दि. स. सं, क्षे . कें. न मुं नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या मध्ये संस्थेतील सर्व प्राध्यापक , शिक्षक व कर्मचारी तसेच सर्व एम. एड स्पेशल एजुकेशन (आई.डी.), बी.एड. वि.शि. (बौ.दि.) आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले . तसेच नवी मुंबई महानगर पालिका इ. टी. सी. केंद्र वाशी श्री दिपक नवगरे प्राचार्य व कर्मचारी वर्ग याचे मोलाचे सहकार्य लाभले