महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग,दि.2 (जिमाका):- जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णूतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार मनोज गोतारणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.