इसम बेपत्ता
पनवेल दि.१९ (संजय कदम) : तालुक्यातील नारपोली गावातील एक इसम आपल्या राहत्या घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
शिवाजी भानूदास विटकर (वय ४० वर्षे) असे या बेपत्ता इसमाचे नाव असून त्याची उंची ५.७ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, केस काळे, डोळे काळे, अंगात लाल रंगाचे फुल शर्ट, वोळया रंगाची साधी पॅन्ट, पायात चप्पल, डाव्या हाताला जखमेच्या टाक्याची खूण, उजव्या हाताला चांदीचे ब्रेसलेट आहे तसेच त्याला भाषा मराठी बोलता येते. सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे ०२२-२७४५२४४४ किंवा पोना एस.बी.सरगर यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : शिवाजी विटकर .