महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सिडकोची विशेष मोहीम

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सिडकोची विशेष मोहीम


महाराष्ट्र शासनाच्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष मोहिमे अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यात असून, या कालावधीत शासनाने अधिसूचित केलेल्या सिडको महामंडळाशी संबंधित सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण नोंदणी आणि नवीन नळ जोडणी सेवांसंदर्भातील नागरिकांच्या अर्जांचा निपटारा करण्याचे निर्देश डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने या अर्जांचा निपटारा करण्यासाठी सिडकोच्या सर्व नोडल कार्यालयांमध्ये 1 ऑक्टोबर 2022 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”अंतर्गत विविध विभाग आणि सेवांशी संबंधित, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा व्हावा या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आपले सरकार, नागरी सेवा केंद्र आणि इतर वेब पोर्टलवरील 10 सप्टेंबर, 2022 पर्यंतच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे.

याचबरोबर डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळाशी संबंधित मालमत्ता नोंदणी आणि नवीन नळ जोडणी संबंधित नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा नोडल कार्यालयांमध्ये तातडीने करण्यात येणार आहे. 

तरी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मालमत्ता नोंदणी आणि नवीन नळ जोडणी संबंधी आपल्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.