आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन 


पनवेल(प्रतिनिधी) सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होतो, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी कानपोली येथे केले. पनवेल तालुक्यात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरु आहेत. त्याअंतर्गत कानपोली गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोली महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल बांधण्यात येणार आहे. या हॉलच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले.

       यावेळी भाजपनेते एकनाथ देशेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील, भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर कानपोली ग्रामपंचायतीच्या सदस्या संगीता पाटील, बाळकृष्ण पाटील, आत्माराम खानावकर, बाबुराव पाटील, परशुराम पाटील, मधुकर पाटील, लक्ष्मण मते, आत्माराम पाटील, आंबो पाटील, निवृत्ती पाटील, सावळाराम मते, गोमा पाटील, अंकुश जोशी, अरुण पाटील, राम चौधरी, राधेशाम चव्हाण, दिनेश पाटील, प्रदिप मते, संतोष पाटील, अक्षय पाटील, राम पाटील, विराज पाटील, रोहित पाटील, प्रल्हाद साळुखे, हनुमान साळुंखे, शोभा मते, सुरेखा जोशी, धर्मा निगृडा, शोभा भला यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.