तालुका महिला मोर्चाच्यावतीने 'व्होकल फॉर लोकल' कार्यक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उदघाटन

तालुका महिला मोर्चाच्यावतीने 'व्होकल फॉर लोकल' कार्यक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उदघाटन 



पनवेल(प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका महिला मोर्चाच्यावतीने स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल' शीर्षकाखाली आज (शनिवार, दि. ०१) आयोजित करण्यात आलेल्या  विविध वस्तू एक दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.  
 पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमधील श्री. गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुलोचना कल्याणकर, नीता माळी, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर, ऍड. प्रमिला डावरेस्नेहल खरे, आदिती मराठे, नीता मंजुळे, सपना पाटील, सुधा नायक, आयोजक महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, प्रतिभा भोईर, समिना साठी, शिल्पा म्हात्रे, लीना पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
      या प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. या प्रदर्शनात गरीब नवाज महिला बचत गट, साई रॅम महिला बचत गट, प्रबुद्ध महिला बचत गट, सहारा महिला बचत गट, उत्पादक गट आजिवली, श्री समर्थ ग्रामसंघ लोणीवली , गावदेवी महिला बचत गट नेरे, श्री शिवकृपा बचत गट भाताणपाडा, नारीशक्ती महिला बचत गट पळस्पे,  दुर्गामाता महिला बचत गट, श्री महालक्ष्मी बचत गट, विघ्नहर्ता महिला बचत गट, जयदुर्गा महिला बचत गट, गावदेवी महिला बचत गट, आदर्श महिला बचत गट, श्री कृपा बचत गट, स्वामी समर्थ बचत गट उसर्ली खुर्द, रखुमाई महिला बचत गट सुकापूर, आईची सावली बचत गट उसर्ली खुर्द  अशा विविध बचत गटांनी  सहभाग सहभाग घेतला होता.