सतरा वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल
नवीन पनवेल : सतरा वर्षीय तरुणाची हत्या केल्या प्रकरणी रवींद्र उर्फ हरियाणी व राज यांच्याविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र उर्फ हरीयाणी व राज हे सलमान नसीम खान यांच्या सेक्टर 14, कामोठे येथील पान शॉप च्या दुकानावर पान खाण्यासाठी येतात. त्यांची एका सोबत भांडण झाले होते व ते दोघे मिळून त्याला लाथाबुक्क्याने व हाताने मारहाण करत होते. यावेळी भांडण सोडवण्याकरता सलमान गेला असता राज यांनी त्याच्याजवळ असलेला चाकू त्या इसमाच्या पाठीमागे भोसकला. व तो इसम खाली जमिनीवर पडला. त्यानंतर रवींद्र उर्फ हरियाणी व राज हे दोघेही तेथून पळून गेले. विशाल राजकुमार मौर्य याला हाताबुक्याने व लाथेने मारहाण करून राज याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने विशालच्या पाठीमध्ये भोसकून त्याची हत्या केली. त्याला एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे घेऊन गेले असता डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दोघां विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.