पत्रकाराला किरकोळ कारणावरून मारहाण

 पत्रकाराला किरकोळ कारणावरून मारहाण


दि.१० आॕक्टो.खारघर (प्रतिनिधी)-खारघरमधील "नवलोकहित दृष्टी" या साप्ताहिकाचे संपादक संदेश सोनमळे यांना एका अज्ञात मोटर सायकल स्वाराने काल रात्री ९-०० वाजताच्या सुमारास सेंट्रल पार्कच्या रस्त्यावरती वाहनाला बाजू देण्याच्या कारणांवरून मारहाण केली.संदेश सोनमळे यांनी याबाबतची तक्रार खारघर पोलीस स्थानकात दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या मोटर सायकलचा फोटो वरती देण्यात आला आहे.