मा.उपमहापौर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या शारदीय नवरात्रोत्सव २०२२ ला नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील साहेब यांची सदिच्छा भेट

मा.उपमहापौर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील  यांच्या शारदीय नवरात्रोत्सव २०२२ ला नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील साहेब यांची सदिच्छा भेट


पनवेल दि.०१ (संजय कदम) : विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालया शेजारी नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होतो. दरवर्षी साजरा होणाऱ्या नवरात्री उत्सवात मानाची आरती असते. या मानाच्या आरतीला ला नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची उपस्थिती लाभली.

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मनोभावे देवीची आरती केली. यावेळी मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांनी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे स्वागत आणि सन्मान केला तसेच उपस्थित इतर अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि भाविकांशी संवाद साधला तसेच विक्रांत पाटील यांचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी नवरात्रोत्सवाला व आपल्या जनसेवा कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल विक्रांत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.