“जैविक खत तंत्रज्ञान” या विषयावर कार्यशाळा संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) मध्ये “जैविक खत तंत्रज्ञान” या विषयावर कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे निवृत्त प्राध्यापक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे, डॉ. महेंद्र रांजेकर आणि संचालक श्री.अमेय महेंद्र रांजेकर (ग्रीन व्हायटलस बायोटेक पुणे) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी.डी.आघाव, विज्ञान विद्याशाखा प्रमुख डॉ. जे.एस.ठाकूर , रुसा समन्वयक डॉ.एस.एन.वाजेकर, लेखा व वित्त विभागाचे प्रमुख व इनक्युबेशन इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. निलेश कोळी, कार्यशाळेचे समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य. डॉ.एस.के.पाटील सरांनी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव वर्षात सुरु असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. महाविद्यालय गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या सर्व योजनांचा सखोल आराखडा मांडला. सूक्ष्मजी
प्रमुख मार्गदर्शक डॉ. महेंद्र रांजेकर व श्री अमेय रांजेकर ह्यांनी विद्यार्थ्यांना जैविक खतांच्या निर्मितीची सखोल प्रक्रिया शिकवली. प्रात्यक्षिका दरम्यान विद्यार्थ्यानी बायोरीएक्टर हाताळणे, तसेच बॉटल फिलिंग, सीलिंग आणि पॅकेजिंग ह्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणा दरम्यान संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कार्यशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले तसेच इंडीयाना युनिव्हर्सिटी यु.एस.ए. विज्ञान विभागाचे डीन डॉ. जॉन डीटूसा व असोसिएट डीन डॉ. राजीव राजे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्राची विद्यार्थिनी कु. स्वलेहा आरिफ हिने केले, तसेच डॉ. अनुभा खरे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य.डॉ.एस.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. निलेश वडनेरे, रुसा समन्वयक डॉ.एस.एन.वाजेकर, लेखा व वित्त विभागाचे प्रमुख व इनक्युबेशन इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. निलेश कोळी आणि जीवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. सीमा कोकितकर , सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रा. गणेश साठे, प्रा.नीलिमा तीदार, प्रा.अर्चना गांधारकर, प्रा.अन्वेश वेमुला , प्रा. नमिता गरुडे, डॉ. अनुभा खरे आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.