जागृती फाउंडेशन च्या तळोजा उत्तर भारतीय सेल च्या अध्यक्षपदी नीरज सिंग पदी यांची नियुक्ती

 जागृती फाउंडेशन च्या तळोजा उत्तर भारतीय सेल च्या अध्यक्षपदी नीरज सिंग पदी यांची नियुक्ती


पनवेल दि. ०६  (प्रतिनिधी ) सामाजिक कार्याची आवड असणारे ,पडघे गावात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले नीरज सिंग  यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती फाउंडेशन च्या  सोबत काम करण्याची इच्छा दर्शवल्याने संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी त्यांची तळोजा विभागीय  उत्तर भारतीय सेल च्या अध्यक्ष पदीनीरज सिंग यांची नियुक्ती केली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निणर्य घेण्यात आला .

रायगड जिल्ह्यात सामाजिक कार्य  करीत असलेल्या जागृती फाउंडेशन चे काम तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे,उपाध्यक्ष संदेश पाटील  प्रामाणिक ,निस्वार्थी पणे करीत आहे ,ते करीत संस्थेच्या माध्यमातून करीत असलेले काम पाहून नीरज सिंग  यांनी देखील संस्थेसोबत काम करायचे ठरवल्याने त्यांची सामाजिक काम  करण्याची आवड बघून त्यांना संस्थेचे  अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी तळोजा विभागीय उत्तर भारतीय सेल च्या अध्यक्ष  पदाची जबाबदारी दिली आहे.