बंगाल असोसिएशनच्या शिष्टमंडळासह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
पनवेल दि.३० (संजय कदम) : रायगड जिल्ह्या प्रमुख शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली कामोठे बंगाल असोसिएशनच्या शिष्टमंडळासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख व मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच रायगड जिल्ह्या प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली कामोठे मधील कामोठे बंगाल असोसिएशनच्या शिष्टमंडळासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.