तानाजी सावंत याचा पनवेल तालुका सकल मराठा समाजाच्या करण्यात आला निषेध

तानाजी सावंत याचा पनवेल तालुका सकल मराठा समाजाच्या करण्यात आला निषेध


पनवेल दि.२८ (वार्ताहर) : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य करणारे मुजोर आणि बेजबाबदार मंत्री तानाजी सावंत याचा पनवेल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक पनवेल येथे जाहीर निषेध करण्यात आला.

        कामाऐवजी वक्तव्य आणि विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबादमध्ये ‘हिंदू गर्वगर्जना’ संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाष्य करताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह व चुकीचे वक्तव्य केले. त्यांच्या व्यक्तव्याचा पनवेल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने श्री छत्रपति शिवाजी महाराज चौक पनवेल येथे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विनोद साबळे, गणेश कडू, मारुती महाडीक, सचिन भगत, विकास वारदे, यतीन देशमुख, पराग मोहिते, राजू नलावडे, रामेश्वर आंग्रे, संतोष जाधव, सदानंद शिर्के, राजेंद्र भगत, प्रविण जाधव, भरत पाटील, स्वप्निल काटकर, कुणाल कुरघोडे, भरत जाधव, ओंकार गावडे, सन्नी टेमघरे, अल्पेश माने, दतात्रेय म्हामुळकर, सचिन जाधव, प्रताप उतेकर, लक्ष्मण थले यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.