राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सीकेटी विद्यालयाचे सुयश

 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सीकेटी विद्यालयाचे सुयश 



पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नविन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या चमकदार कामगिरी बद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. वर्ल्ड फुनकोबी शोतोकन कराटे आयोजित ३३ व्या नॅशनल ओपन कराटे
चॅम्पियनशीपचे स्पर्धेचे आयोजन १६ ऑक्टोबरला खारघर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ह्या सार्धेत सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदके मिळवून आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. ह्या चॅम्पियनशीपमध्ये रौनक नाकटे, श्राव्या थळे, प्रणव कांबळे, आरब झोडगे, दिशांत जाधव, ईशा चव्हाण, विघ्नेश पाटील, अर्थ पांडव यांनी सुवर्ण पदक तसेच सुहम बहिरा, दक्ष सुरते यांनी रौप्य पदक पटकावले आहे. कराटे चॉम्पियनशीपमधील यशस्वी विदयार्थ्याचा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.