निष्ठा यात्रेचे पनवेल मध्ये करण्यात आले उत्साहात स्वागत

 निष्ठा यात्रेचे पनवेल मध्ये करण्यात आले उत्साहात स्वागत 


पनवेल दि. ०२ ( संजय कदम ) बीड वरून शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या निष्ठा यात्रेचे पनवेल येथे आज आगमन झाले असता पनवेल शिवसेना शाखेतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले.

        ही यात्रा  उल्हास गिरम, शिवसेना माजी तालुका प्रमुख, बीड यांच्या नेतृत्वाखाली 100 शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडीत आहे.

     पनवेल येथे या यात्रेचे स्वागत शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या प्रसंगी युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपशहर प्रमुख सनी टेमघरे, विभागप्रमुख नंदू घरत, उप विभागप्रमुख अमोल गोवारी, अल्केश जाधव, नितीन कसाबे (वाहतूक सेना),  उपशहर अधिकारी साईसूरज पवार , संकेत बुटाला, राकेश टेमघरे, अमर पटवर्धन, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकुर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.