IWBP प्रकल्प आणि माझी वसुंधरा अभियान 3.0 बाबतची कार्यशाळा संपन्न
अलिबाग, दि.2 (जिमाका):- रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यांसाठी "Integrated Web Based Portal" (IWBP प्रकल्प) बाबतचे प्रशिक्षण दि.29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी तर "माझी वसुंधरा अभियान 3.0" च्या अनुषंगाने कार्यशाळा दि.29 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झाली.
हे प्रशिक्षण व कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. शाम पोशट्टी, यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.
IWBP प्रकल्पाचे प्रशिक्षण कोकण विभागाच्या विभागीय नोडल ऑफिसर कु.कृतज्ञा पाटील व रायगड जिल्हा नोडल अधिकारी श्री.प्रविण भोई यांच्यामार्फत देण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा ऑनलाईन पध्दतीने दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रशासकीय कामकाजात सहाय्यासाठी एकूण 27 मोड्युल पुरविले जाणार आहेत. हा प्रकल्प Ease of doing business (EoDB) तसेच सेवा हमी कायदयांतर्गत (Right to Service Act) येणाऱ्या सेवा पुरविण्याकरिता अत्यंत आवश्यक आहे.
या प्रशिक्षणामध्ये IWBP प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 27 मोडयुल पैकी EoDB व RTS शी संबंधित एकूण 6 मोडयुलचे प्रशिक्षण देण्यात आले. (1. Trade License 2.Water 3. Property 4.Accounts/Finance management 5.Marriage Registration 6.NOC Module)
तसेच "माझी वसुंधरा" बाबतच्या कार्यशाळेमध्ये विभागीय तांत्रिक तज्ञ श्रीमती संजीवनी जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये "माझी वसुंधरा अभियान 3.0" अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश ही पंचतत्वे आणि पर्यावरण संवर्धन या विषयांची विस्तृत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित सर्वांनी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली "Integrated Web Based Portal" म्हणजेच IWBP प्रकल्प आणि "माझी वसुंधरा अभियान 3.0" रायगड जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प केला.