क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना शुभेच्छा
महिलांच्या विवीध विषयांवर करण्यात आली चर्चा
पनवेल / प्रतिनिधी
पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत काही वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये परिमंडळ २ पोलीस उपायुक्तपदी पंकज डहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस खात्यातील बदल्यांमध्ये रा.रा.पोलीस बल गट क्रं.4 नागपूर येथे कार्यरत असलेले पंकज दिलीपराव डहाणे यांची नवी मुंबई आयुक्तालयातील परिमंडळ २ या ठिकाणी बदली करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारताच पनवेलमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची भेट घेऊन त्यांना तुळशीरोप व थोरवंत महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुलामगिरी पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई शिंदे, किरण अडागळे. रत्नमाला पाबरेकर, स्नेहा धुमाळ, दीपा कोपर्डे, शीतल पांचाळ उपस्थित होते. यावेळी महिला सुरक्षा व महिला पत्रकार यांच्याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.