रविवारी 'घराणा रंग' संगीत संवादात्मक कार्यक्रम; पनवेलचे सुपूत्र पंडित उमेश चौधरी यांचे होणार शास्त्रीय गायन

रविवारी 'घराणा रंग' संगीत संवादात्मक कार्यक्रम; पनवेलचे सुपूत्र पंडित उमेश चौधरी यांचे होणार शास्त्रीय गायन 



पनवेल(प्रतिनिधी) नादब्रह्म परिवार बोरिवलीच्या वतीने रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी 'घराणा रंग' या संगीत संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पनवेलचे सुपूत्र सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाची पर्वणी संगीत रसिकांना मिळणार आहे. 
        उस्ताद अझीम खान यांच्या संकल्पनेनुसार हा संगीत कार्यक्रम बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात दुपारी ३. ३० वाजता होणार आहे. या संगीत उत्सवात पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गीत सुरमयी व्यक्तिमत्व संगीत विशारद रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. यावेळी त्यांना तबल्यावर किशोर पांडे व श्रीनिवास शेंबेकर यांची तर संवादिनीवर भक्ती ब्रहो घैसास यांची साथ लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका प्रा. विजया पाटील या करणार आहेत. वीस वर्षाच्या संगीत साधनेच्या कालावधीत पंडित उमेश चौधरी यांनी आपल्या अथक साधनेने गायन कलेवर प्रभुत्व निर्माण केले आणि या गायन तपस्येतून त्यांनी अनेक पुरस्कार, मानसन्मान, नामांकने मिळवली असून त्यांचा त्यांचे शास्त्रीय गायन रसिकांसाठी सुरमयी पर्वणी असते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रवेशिका किंवा अधिक माहितीसाठी जाळगावकर(९८२१४५७४७५), कोळी (९८२०४९४४०२) किंवा पाटील (९३२१३२७४०७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नादब्रह्म परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.