कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन

कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे आयोजन


अलिबाग,दि.16(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कृषी विभाग माणगाव यांच्यामार्फत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण व भेटीचे पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास तळेगाव दाभाडे येथील फुलशेती, कांदा व लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी संशोधन केंद्र बाभळेश्वर, कृषीथॉन शेतकरी प्रदर्शन, नाशिक कृषी प्रक्रिया उद्योग व  प्रगतशील शेतकरी इत्यादी ठिकाणास भेट देणार आहेत.

 तरी माणगाव, तळा, रोहा व पाली या तालुक्यातील प्राधान्याने इच्छुक महिला शेतकऱ्यांनी आपली नोंदणी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि.19 नोव्हेंबर 2022 पूर्वी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी  आनंद कांबळे यांनी केले आहे.