रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने 'कृतज्ञता सप्ताह' चे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्याचे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फोफावण्यामध्ये त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या पाचही विभागांच्या वतीने जन्म दिनाच्या औचित्याने 'कृतज्ञता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर यांनी दिली. ते कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, दिलीप पाटील आदी मान्यवरांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असून या वर्षी त्यांच्या संस्थेच्या जनरल बॉडी सभासदत्त्वासही वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस प्रत्येक शाखेत विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच रायगड विभागातील संस्थेचे पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व शाळांचे चेअरमन व स्कूल कमिटी जेष्ठ सदस्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये दिनांक ०६ ते १२ डिसेंबर पर्यंत रायगड विभागीय स्तरावरील 'कृतज्ञता सप्ताह' आयोजित करण्याचे एकमताने ठरले होते. त्यानुसार रायगड विभागीय स्तरावरील 'कृतज्ञता सप्ताह' मध्ये वक्तृत्त्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला / पोस्टर्स स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, क्रीडास्पर्धा, महारांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागांतर्गत रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई व पालघर जिल्हा या ठिकाणच्या शाळा समाविष्ट होतात. रायगड विभागाचे पोलादपूर गट, उरण गट, पनवेल गट, मुंबई गट आणि मोखाडा /डोळखांब गट असे वर्गीकरण करण्यात येते. येथील सर्व शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. पवार साहेब म्हणजे हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तिमत्वाचे विचार,त्यांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अनन्यसाधारण योगदान, प्रगतीवादी विचारांची कास धरत साधलेले विकास पर्व! हे सारे घडणाऱ्या पिढ्यांना कळावे या उद्देशाने कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
- असे आहेत कार्यक्रमे-
०६ डिसेंबर ते ०८ डिसेंबर - क्रीडा स्पर्धा - स्थळ- प. जो. म्हात्रे विद्यालय, नावडे
०७ डिसेंबर - वक्तृत्व स्पर्धा - स्थळ- श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, गव्हाण
०७ डिसेंबर - निबंध स्पर्धा- स्थळ- अनंत पांडुरंग भोईर विद्यालय,
०८ डिसेंबर - विज्ञान प्रदर्शन -स्थळ- लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉ. कामोठे
०९ डिसेंबर - तज्ञ् मार्गदर्शक व्याख्यान- स्थळ- न्यू इंग्लिश स्कुल, कामोठे
०९ डिसेंबर - सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा- स्थळ- न्यू इंग्लिश स्कुल, कामोठे
०९ डिसेंबर - महारांगोळी- स्थळ- माजी आमदार दत्तुशेठ पाटील स्कुल, कामोठे
०९ डिसेंबर ते १० डिसेंबर - वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा (महाविद्यालय गट), आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धा - स्थळ- महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल
११ डिसेंबर - हाफ मॅरेथॉन - स्थळ- वीर वाजेकर कला, विज्ञान व महाविद्यालय, फुंडे
१२ डिसेंबर - वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, परिसर स्वच्छता - स्थळ- रयत शिक्षण संस्था, रायगड विभागातील विविध शाखा मुख्यालये.
१६ डिसेंबर - विभागीय स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ - स्थळ- विष्णुदास भावे