खारघर शहर “नो लीकर झोन" घोषित करण्याची पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची आयुक्तांनकडे निवेदनाद्वारे मागणी
पनवेल : खारघर शहरात निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीचा परवाना दिला आहे. तब्बल १५ वर्षांनंतर शहरात नव्याने बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. खारघरची ओळख ही नो लीकर झोन म्हणून आहे. या ओळखीला तडा जात असल्याने शेकापच्या शिष्टमंडळाने माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि. ९ रोजी भेट घेत खारघर शहराला अधिकृतरीत्या 'नो लीकर झोन'चा दर्जा देण्याची मागणी केली