खारघरमधील दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात-मा.विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची पनवेल महापालिकेकडे मागणी
पनवेल (प्रतिनिधी)-पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या बाहेरही खारघर शहर झपाट्याने वाढले आहे. या गोष्टीचा विचार करून खारघरकरांची मते जाणून दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात. तसेच पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत सोमवारी झालेल्या प्रशासकिय महासभेमध्ये पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दारूबंदीसाठी ठराव घेऊन ज्या सीमा कायम केलेल्या आहेत त्या ठरावाची मागणी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.