नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

 नॅशनल ॲवॉर्डसाठी प्रस्ताव सादर करावे

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 11 : नागरिकांमध्ये मतदानाबाबत शिक्षण आणि जाणिव जागृती करण्यासाठी काम करणाऱ्या माध्यम संस्थांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी माध्यम संस्थांनी अर्ज करावेतअसे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

            चार गटांसाठी हे पुरस्कार आहेत. प्रिंट मिडियाटेलिव्हिजनरेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट) सोशल मीडियासाठी हे पुरस्कार आहेत. प्रमाणपत्रमानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच दि. 25 जानेवारी रोजी केले जाईलअसे त्यांनी सांगितले.

पुरस्काराची निवड मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची गुणवत्ता, उपाययोजनांची वारंवारता, उपाययोजनांचा मतदारांवर झालेला परिणाम, निवडणुकीच्या सुलभतेबाबतची प्रसिद्धी आणि इतर अनुषंगिक उपाययोजना या मुद्यावर निवड केली जाईलअशी माहिती श्री. देशपांडे यांनी यांनी यावेळी दिली.