राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीबद्दल लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले साहिल जाधवचे कौतुक

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीबद्दल लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले साहिल जाधवचे कौतुक 


पनवेल (प्रतिनिधी)  पंजाब येथे संपन्न झालेल्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रास सुवर्ण पदक मिळवून देत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आलेल्या याचबरोबर आपल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर ज्याची नुकतीच भारतीय खो-खो संघात निवड करण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील पोफळघर संघाचा स्टार खेळाडू महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार साहिल संतोष जाधव याचे  भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी भरभरून कौतुक केले.यावेळी दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे,अॅड. संतोष पवार, प्रमोद गोळे आदी उपस्थित होते.

       स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत रोमहर्षक व अतीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात अप्रतिम खेळ खेळत महाराष्ट्र संघाने बलाढ्य आंध्र प्रदेश संघाचा पराभव करीत दिमाखात सुवर्णपदक पटकावले. पंजाब येथे संपन्न झालेल्या याच स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन इंडिया राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार रोहा तालुक्यातील पोफळघर येथील स्टार खो-खो खेळाडू साहिल संतोष जाधव याने संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात उत्तमोत्तम सुवर्ण कामगिरी बजावत महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत साहिलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला. याचबरोबर या स्पर्धेतील साहिल जाधव याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याची नुकतीच भारतीय खो-खो संघात निवड झाली. याच पार्श्वभूमीवर साहिलचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील साहिलच्या या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करत पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान मैदानी खेळाची आवड जोपासणारे तसेच वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन देत सर्वोतोपरी सहकार्य करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य साहिल जाधव याला त्याच्या या प्रवासात लाभले असल्याचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांनी सांगितले .