नवी मुंबई महानगरपालिका- संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन

 

नवी मुंबई महानगरपालिका-

                                                     

 

संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन



 नवी मुंबई- संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभइवादन करण्यात आले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री. अनंत जाधव, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सोनावणे, श्री. सुनील लाड, श्रीम. शुभांगी दोडे, उपअभियंता श्री. सुधाकर मोरे आणि अधिकारी, कर्मचारी तसेच डॉ. डि. वाय. पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

त्याचप्रमाणे 26 /11/ 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान, नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती वाशी नवी मुंबई आणि नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन यांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या विधी सेवा प्राधिकरणाबाबतच्या जनजागृतीपर उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे विधी अधिकारी श्री. अभय जाधव यांनी उपस्थित डॉ. डि. वाय. पाटील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

कायद्याचे शिक्षण घेत असतानाच न्यायालयात जाऊन प्रत्यक्ष केसेस सुरू असताना उपस्थित रहावे व त्यांचे बारकाईने अवलोकन करावे. यामधून प्रत्यक्ष शिकायला मिळेल व अनुभवांत भर पडून त्याचा पुढे उपयोग होईल अशा शब्दात श्री. अभय जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रात्यक्षिक अभ्यासाची दिशा दाखविली.