कामोठे येथील आगीच्या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची तसेच नुकसान भरपाईची कामोठे कॉलोनी फोरमची मागणी

कामोठे येथील आगीच्या घटनेतील  दोषींवर कारवाई करण्याची तसेच नुकसान भरपाईची कामोठे कॉलोनी फोरमची मागणी



पनवेल (प्रतिनिधी)- काल दुपारी मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळील पार्किंग मधे उभ्या असलेल्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. ह्या आगीमुळे कामोठे करांचे लाखोंचे नुकसान झाले. 

ह्या घटनेची दखल घेत आज कामोठे कॉलोनी फोरमतर्फे घटनास्थळाची पाहणी करत सिडको तसेच रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यात आला. पंत प्रधान आवास योजने मुळे सिडकोने नागरिकांच्या हक्काची पार्किंग हिरावुन घेतली. अडीच ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या कामोठे शहराला पुरेसे पार्किंग उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत आहे. कामोठे कॉलोनी फोरम तर्फे यापूर्वी वारंवार सिडको प्रशासनाकडे पार्किंग साठी पाठपुरावा केलेला असुन सिडकोला विषयाचे गांभीर्य कळलेले नाही. कालच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिडकोने नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कॉलोनी फोरम तर्फे करण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन मास्तर ह्यांना जाब विचारला असता त्यानी आधीच सिडको प्रशासनाला स्टेशन परिसरातील सुकलेले गवत कापण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळाली, सिडकोने जर वेळीच कारवाई करत स्टेशन परिसरातील गवत साफ केले असते तर काल लागलेली आग मोठ्या प्रमाणात पसरली नसती. त्यामूळे काल झालेल्या नुकसानास सिडकोचा हलगर्जीपणा सुद्धा जबाबदार आहे.

तसेच काल स्टेशन परिसरात लागलेली आग निव्वळ अपघात होता की घातपात ह्याची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची कामोठे पोलिस स्टेशनला लेखी मागणी कामोठे कॉलोनी फोरमतर्फे करण्यात आली.  

ह्यावेळी कामोठे फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा,शुभांगी खरात, बापु साळुंखे, राहुल बुधे, संदिप इथापे, रवी पाढी, निरव नंदोला, जयवंत खरात, प्रविण भालतडक उपस्थित होते.


कोट-

"अपूऱ्या  पार्किंग ला सिडको जबाबदार असुन,ह्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत सिडकोने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी. तसेच पोलिस प्रशासनाने ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी."*

मंगेश अढाव 

अध्यक्ष कामोठे कॉलोनी फोरम