रोटरी घनदाट जंगल प्रकल्पासाठी ठाकूर कुटूंबियांचे योगदान
पनवेल(प्रतिनिधी) रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत दोन हजार रुपये देणगी मूल्य देऊन आपल्या स्वतःच्या नावाने नावाने किंवा आप्तस्वकीयांच्या नावाने स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले. त्या अभियानात दानशूर ठाकूर कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले आर्थिक योगदानही दिले आहे.