कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने संविधानदिना निमीत्त सामुहिक संविधान प्रस्तावना वाचन तसेच दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने संविधानदिना निमीत्त सामुहिक संविधान प्रस्तावना वाचन तसेच दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण


कामोठा (प्रतिनिधी)- आज संविधान दिनाचे औचित्य साधत कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने संविधान प्रस्तावनेचे सामुहिक वाचन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून महापूरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कॉलोनी फोरमचे समन्वयक महेंद्र जाधव ह्यांनी सुत्रसंचालना दरम्यान भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले. ज्या संविधानाने नागरिकांना शिक्षणाचा, समानतेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच जगण्याचा मुलभुत अधिकार दिला त्या भारतीय संविधानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या ऊद्देशाने आज उपस्थित नागरिकांना संविधान प्रस्तावनेचे वाटप करण्यात आले. 

ह्यावेळी 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ह्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान बचावपथकाचा भाग असलेल्या अग्निशमन अधिकारी संदीप इथापे (समन्वयक, कॉलोनी फोरम) ह्यांनी त्यादिवसाचा थरार वर्णन करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.

ह्यावेळी कॉलोनी फोरमचे अध्यक्ष श्री. मंगेश अढाव तसेच महिला अध्यक्षा सौ. जयश्री झा ह्यांनी संविधान दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले तसेच शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. 

ह्यावेळी कॉलोनी फोरमचे समन्वयक महेंद्र जाधव, अरुण जाधव, संदीप इथापे, ॲड.समाधान काशिद, डॉ. गारळे, राहुल बुधे, निलेश आहेर, राहुल आग्रे,बापु साळुंखे, सुनिल कर्पे, देवानंद बाठे, प्रविण भालतडक, अनिल पवार, सत्यविजय तांबे, जयवंत खरात, शितलकुमार शिंदे, सचिन खरात, संतोष गुप्ता, सतिश मोहिते, अरुण दांडगे, संदीप सुरडकर, किरण सोनवणे, सुनिल लोखंडे, गीता कुडाळकर, शुभांगी खरात, अर्पिता वाणी, श्वेतल भुसारी, संजीवनी तोत्रे, संज्योली कासारे, वीणा कांबळे, मुक्ता घुगे, सुजाता बत्तीन, वर्षा दांडगे, सुनीता निरमल, उषा किरण शिंगे, आशा गुप्ता ह्यांच्यासह शहरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.