"पनवेल महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे"* या आशयाचे फलक लावावेत यासाठी खारघर भाजपा सरचिटणीस दिपक शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन

"पनवेल महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे"* या आशयाचे फलक लावावेत यासाठी खारघर भाजपा सरचिटणीस दिपक शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन


पनवेल(प्रतिनिधी)- पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येऊन सहा वर्षे उलटून गेली तरी पालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गांवर स्वागत व धन्यवादाचे फलक लावले गेलेले नाही. नवी मुंबई पालिकेला लागून असलेल्या खारघर शहराच्या बेलपाडा गावावरून पालिकेची हद्द सुरु होते व पनवेल येथील ONGC सिग्नल ला हद्द संपते. शिवाय ठाणे महानगरपालिकेला लागून असलेल्या मुंब्रा - पनवेल महामार्गांवरील धानसर गावाजवळ हद्द संपते. या तिन्ही ठिकाणी स्वागत व धन्यवाद चे फलक लावण्यासाठी खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना मेल करून निवेदन दिलेले आहे.

याशिवाय पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर व मा.सभागृह नेते परेश ठाकूर यांना सुद्धा निवेदन दिले आहे.