माथेरानमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भाजपात; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले पक्षात स्वागत
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी शिंदे, सीमा कदम, जयश्री कदम, मेघा कोतवाल, चैतन्य शिंदे, रमेश कदम यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
कर्जत तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, किरण ठाकरे, प्रवीण सकपाळ, आकाश चौधरी, किरण चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेशास सुभाष भोसले, राजेश चौधरी, प्रदीप घावरे,चंद्रकांत जाधव, संतोष कदम, संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते .