सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर


पनवेल(प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दिनांक 05 डिसेंबर रोजी गुळसुंदे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपर्यंत हे शिबीर गजानन हौसिंग सोसायटी येथील श्री गजानन मंदिरात होणार आहे.

समाजकार्याची आवड असलेले स्वप्नील चौलकर यांनी सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या मित्रपरिवाराकडून या शिबिराचे आयोजन केले गेले आहे.

      विविध प्रकारचे आजार आणि उपचार या अनुषंगाने रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत असते.वेळेवर उपचार आणि त्यानुसार रक्ताची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने विविध संस्थेच्या माध्यमातून शिबिरे आयोजित केली जातात. त्याच पार्श्वभूमीवर स्वप्नील चौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.