हायकलतर्फे युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम
पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल कंपनीने इंटरनॅशनल असोसि एशन फॉर ह्यूमन वॅल्यूज् या आपल्या एनजीओ बरोबर संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील महाड येथील सुतारकोंड गावात युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन लोकांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी आणि गावाच्या विकासावर सर्वसमावेशक अगदी ३६० डिग्रीने दृष्टिकोन दिला जाईल. हा कार्यक्रम जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि पद्धतशीरपणे प्रशिक्षण देऊन दैनंदिन जीवनातील गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.
हायकल लिमिटेडही एक अशी आघाडीची फाइन रासायनिक कंपनी आहे जिच्या बरोबर औषधोत्पादन, पीक संरक्षण, पशू आरोग्य, बायोटेक आणि विशेषतः रासायनिक उद्योगातील प्रमुख जागतिक कंपन्या भागीदार होण्यास प्राधान्य देतात. कंपनीने आपल्या विविध उपक्रमांद्वारे ग्रामीण भागाचा विकास करणे, लोकांना उपयुक्त व सकारात्मक मार्गांनी प्रेरित करणे आणि त्यांची कौशल्ये समोर आणून त्यांना बळकटी देणे हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हा उपक्रम व्यक्तींना त्यांचे सामर्थ्य आणि उणीवा ओळखण्यास, वैयक्तिक आणि सामुदायिक उद्दिष्टे निश्चित करण्यास आणि आपले नेतृत्व कौशल्य विकसित करून आत्मसन्मान, आत्मविश्वास व प्रेरणा वाढविण्यास मदत करणारा आहे. नेतृत्व क्षमतांचा विकास झाल्याने तरुणांना त्यांचे सामाजिक नेटवर्क तयार करण्यात मदत होते आणि जेणेकरून ते सामाजिक विकासामध्ये सहभागी होऊन सकारात्मक सामाजिक प्रभाव पाडू शकतील. नेतृत्व प्रशिक्षणातील सहभागी व्यक्ती इतरांसाठी उत्तम उदाहरण कसे मांडायचे, त्यांचे विचार व वर्तन कसे प्रभावित करायचे आणि लोकांना काम करण्यास कसे उद्युक्त करायचे हे यातून शिकवले जाते.
या उपक्रमाबाबत बोलताना हायकल लिमिटेड च्या ह्यूमन रिसोर्स विभागाचे अध्यक्ष रतिश झा म्हणाले, “हायकल लिमिटेड ग्रामीण समाजाला सक्षम बनविणारे समुदाय विकास उपक्रम आयोजित करण्यात आघाडी वर आहे. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये कौशल्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करीत आहोत.आपल्या समाजाला उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी उत्तम संधी उपलब्ध करून देणे हाच केवळ या मागील उद्देश आहे. युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम हा असाच एक उपक्रम आहे आणि आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ५०% या महिला आहेत. यावरून हेच दिसते की हळूहळू आपण या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे बदल घडवून आणत आहोत. हेच देशाचे तरुण उद्याचे भविष्य घडवतात यावर आमचा ठाम विश्वास आहे. म्हणून या युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आम्ही जेथे काम करतो त्या परिसरातील ग्रामीण समुदायाच्या तरुणांना उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याचे आमचे ध्येय आहे.”
हायकललिमिटेड बरोबर त्यांचे एनजीओ भागीदार ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्यूज्’ यांनी देखील महाड मधील जिल्हा परिषद शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी, ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी मदत केली आहे. आरोग्य संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून समाजाचे जीवनमान सुधरविण्यासाठी हायकल काम करीत आहे. कंपनीने ग्रामीण महिलांना मासिक आरोग्य व स्वच्छतेबद्दल शिक्षित करण्यासाठी अनेक आरोग्य कार्यक्रमांचीही व्यवस्था केली आहे.