जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून मानवी हक्क दिवस जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
अलिबाग, दि.12(जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 10 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, अलिबाग तहसिल कार्यालय आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिवस जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे को.ए.सो.जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालय, अलिबाग येथून रॅली स्टेट बँक अलिबाग, कामत आळी अलिबाग, दत्त मंदिर अलिबाग, कन्याशाळा अलिबाग, यामार्गे मार्गक्रमण होवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.मनोज गोतारणे यांनी उपस्थित विद्यार्थांना मानवी हक्क दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि तरुण विद्यार्थ्यांनी या दिनाविषयी सामान्य नागरिकांपर्यंत प्रसार करण्यास आपलाही सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येवून रॅलीचा समारोप करण्यात आला.