अलिबाग जिल्हा रुग्णालय येथील सिटी स्कॅन मशिन सर्वसामान्य रुग्णांसाठी कार्यान्वित

अलिबाग जिल्हा रुग्णालय येथील सिटी स्कॅन मशिन सर्वसामान्य रुग्णांसाठी कार्यान्वित


अलिबाग, दि.30(जिमाका) :- जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे क्ष-किरण विभागात सिटी स्कॅन मशिन दि.23 नोव्हेंबर 2022 पासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होती. तथापि आज AOV International या कंपनीच्या इंजिनियरने येवून मशिनची दुरुस्ती केली असून सद्य:स्थितीत अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन सर्वसामान्य रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.

       भविष्यात जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील सिटीस्कॅन मशिन तांत्रिक कारणामुळे बंद झाल्यास अलिबाग मधील लोटस सिटी स्कॅन व एमआरआय केंद्रासोबत सामंजस्य करार करुन अनसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रय रेषेखालील रुग्णांना सिटी स्कॅन चाचणी सुविधा मोफत पुरविण्याबाबत आरकेएस मधून मंजूर करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.किरण पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.