प्राच्यविद्या संशोधनला साडेसात कोटी अनुदान
पनवेल(प्रतिनिधी) मूर्ती ट्रस्ट या सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसनक्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारत, व्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहे. सुधा मूर्ती यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन पुणे येथे करण्यात आले.