कोकण विभागातील जिल्हा नियोजन समित्यांनी प्राप्त निधीचे प्रभावी व कालबध्द नियोजन करावे - कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर
मुंबई, दि,२० : विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय कामांचे नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या
मुंबई उपनगर, जिल्हाधिकारी कार्यालयात,विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत श्री.कल्याणकर बोलत होते. या बैठकीस उपआयुक्त (नियोजन) संजय पाटील, श्री. उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी मुंबई उपनगर विकास गजरे, विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांचे जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त, महेंद्र कल्याणकर म्हणाले, कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत विविध योजनांखाली प्राप्त तरतुदींचे सुयोग्य विनियोग होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अधिक सोयीसुविधा पुरविण्याबाबत काम करावे. सर्व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी विकास क्षेत्र निहाय सुक्षम नियोजन करावे तसेच शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी स्वतंत्र चिन्हांकित 1% निधीचा कल्पकतेने वापर करावा. यामध्ये जिल्ह्यातील जैवविविधता वाढीस लागण्यासाठी प्रकल्प हाती घ्यावे. कोकण विभागातील महसूल यंत्रणा बळकट करण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेप्रमाणे वाहने पुरविण्यासाठी कार्यवाही करावी.
माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत निधीचा 100% विनियोग करण्याच्या सक्त सुचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी बैठकीत दिल्या.