रत्नाकर पाटील, रुपाली शिंदे, राकेश भुजबळ स्वच्छता चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित
नवीन पनवेल(प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा रूपाली शिंदे, उत्कर्ष सांस्कृतिक कला, क्रिडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ यांना प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार सोहळा पनवेल महापालिकेच्या प्रभाग 'ड' कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, प्रभाग 'ड' चे अधिकारी अमर पाटील, स्वच्छता निरीक्षक अनिकेत जाधव यांच्यासह पर्यवेक्षक रमेश गरुडे , नंदू जाधव, उत्तम चिखलेकर, संदीप जाधव, अंकुश पाटील, क्रांती चितळे, जयराज भोईर, असलम शेख आणि नागरिक उपस्थित होते.