नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताकदिनी आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

 

 

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात प्रजासत्ताकदिनी आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण




           नवी मुंबई(प्रतिनिधी)-भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दल व अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची राष्ट्रीय पोषाखामध्ये पारंपारिक पध्दतीने फेटे परिधान करून असलेली उपस्थिती लक्षणीय होती.

             प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीस तिरंगी रंगात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. ती बघण्यासाठी तसेच 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील मोठ्या प्रतिकात्मक राष्ट्रध्वजासह सेल्फी काढण्यासाठीही नागरिक सहकुटूंब मुख्यालय परिसराला भेट देत आहेत. आज हजारो नागरिकांच्या सोशल मिडीया स्टेटसवर तिरंग्यासह सेल्फी किंवा तिरंगी विद्युत रोषणाईत झळाळणारे मुख्यालयाचे छायाचित्र प्रदर्शित झाले.