बलात्कारातील दुसऱ्या आरोपीला केली अटक
नवीन पनवेल :बार मध्ये काम करणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज मारुती देवडे उर्फ वाकड्या (२२, राहणार पंचशील नगर, नवीन पनवेल) याला राहत्या घराच्या परिसरातून अटक करण्यात आली.
खोपोली येथील एका बारमध्ये काम करणारी महिला पनवेल होऊन राहत्या घरी करंजाडे येथे जात होती. यावेळी रात्रीच्या वेळेस दोन आरोपींनी तिला नवीन पनवेल येथील पडक्या ईमारतीत नेऊन बलात्कार केला. त्यानंतर ते दोघेही पळून गेले. पोलिसांनी अविनाश चव्हाण या आरोपीला 24 तासाच्या अटक केली होती. त्यानंतर दुसरा आरोपी पळून गेला होता. त्याला 2 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास राहत्या घराच्या परिसरातून अटक केली. आरोपी अविनाश चव्हाण याला 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
जेएनपीटीत नोकरी लावतो असे सांगून केली फसवणूक
नवीन पनवेल : जेएनपीटीमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्या बदल्यात पाच लाख 25 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी सुनील कृष्णा म्हात्रे (जसखार) याच्या विरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत शंकर अहिरे हे मोराज सोसायटी, सेक्टर 16, सानपाडा येथे राहतात. त्यांची सुनील म्हात्रे यांच्याशी ओळख झाली. ते बेरोजगार मुलांना काही पैसे खर्च करून नोकरी लावत असल्याबाबत त्यांना माहिती मिळाली. यावेळी त्यांचा मुलगा सचिन अहिरे याला कम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी दहा लाख रुपये लागतील व त्यातील पाच लाख टोकन देण्याचे ठरले. उर्वरित रक्कम नोकरी लागल्यानंतर देण्याचे ठरले. 2016 मध्ये पाच लाख रुपयांचा चेक देण्यात आला. व मुलगा सचिन अहिरे याची शैक्षणिक कागदपत्रे दिली. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये सचिनचे मेडिकल असल्याचे सांगून तेथील डॉक्टरांना मॅनेज करण्यासाठी पंचवीस हजार रुपये रोख घेतले. व मुलाचे जेएनपीटी मधील जॉइनिंग लेटर, कागदपत्रे दाखवली. मात्र ती कागदपत्रे अहिरे यांना दिली नाहीत. ते जॉइनिंगच्या दिवशी मिळतील असे सांगण्यात आले. काही वेळानंतर नोकरी बद्दल काय झाले असे विचारले असता म्हात्रे वेळ मारून नेत असत. त्यानंतर म्हात्रे यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले. घरी जाऊन त्याची भेट घेण्याची प्रयत्न केला असता त्यांनी त्याचे घर बदलले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अहिरे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बँकेचे खात्यातून 70 हजार रुपये काढले
नवीन पनवेल : बँकेचे डेबिट कार्ड व बँकेशी संलग्न असलेले सिम कार्ड चोरी करून बँकेच्या खात्यातून 70 हजार 896 रुपये काढून घेतल्याप्रकरणी चौघा विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी रेसिडेन्सी, हेदूटने येथील विजय तुकाराम जाधव हे पवन सिंग, आकाश सिंग, प्रांजळ व भोपाळसिंग यांच्यासह राहण्यास आहे. ते दीपक फर्टीलायझर, तळोजा येथे काम करतात. ते आंघोळ करून आल्यानंतर त्यांनी मोबाईल पाहिला असता सिम कार्ड चालू होत नव्हते. यावेळी सिमकार्ड काढून पाहिले असता त्यात त्यांच्या सिम कार्ड ऐवजी दुसरे तुटलेले सिम कार्ड मिळून आले. मात्र कामात असल्याने ते सिम कार्ड बदलून घेण्यासाठी गॅलरीत गेले नाहीत. यावेळी त्यांना बँकेचे एटीएम कार्ड खिशामध्ये मिळून आले नाही. त्यांनी त्यांच्या खात्यासंबंधी माहिती विचारली असता त्यांच्या खात्यातून नोव्हेंबर 22 ते डिसेंबर 22 दरम्यान 70 हजार
स्वेच्छा निवृत्ती फॉर्मवर पतीने केल्या बनावट सह्या, गुन्हा दाखल
नवीन पनवेल : जेएनपीटीच्या स्वेच्छानिवृत्ती फॉर्मवर पतीने बनावट सह्या केल्या. व त्या बनावट सह्या असल्याचे माहित असताना देखील त्या खऱ्या असल्याचे वापरल्या प्रकरणी पतीविरोधात कलम 465 आणि 471 नुसार न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएनपीटी, टाऊनशिप सेक्टर 2 येथील शुभांगी राजेश म्हात्रे यांचे पती राजेश म्हात्रे हे जेएनपीटी पोर्ट मध्ये ऑपरेशन विभागात नोकरी करत होते. त्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. जेएनपीटी पोर्ट मधून स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी असलेले वेगवेगळ्या फॉर्मवर शुभांगी म्हात्रे यांची सही आवश्यक असताना ती सही न करता पतीची स्वेच्छा निवृत्ती कशी मंजूर झाली याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी प्रशासकीय भवन, जेएनपीटी पोर्ट येथे भेट दिली. यावेळी सही बाबत विचारपूस केली असता त्यांच्या सहीचे बनावटीकरण केले असल्याचे तेथून सांगण्यात आले. व बँकेत जॉईंट खाते देखील केले असल्याचे त्यांना समजले व तेथे सुद्धा शुभांगी यांची खोटी सही करून खाते उघडले. या प्रकरणी पती राजेश धर्मा म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.